Saturday, April 30, 2011

तुमच्या सोबतही असा होते का?

नकळत अचानक काही गोष्टी आठवतं आणि मनाला नकळतच एक काम लाऊन जातात. समजत नाही असा का होते , पण हे जसा माझ्याबरोबर होते तसा तुम्च्याबारोबारही होत असेल असा मी समजते. काही कारण नसताना असंख्य प्रश्न मनात येतात आणि त्यांची उत्तर जवळ नसतान डोकं भंडावून सोडतात... का, कशाला,कशासाठी... माहिती नाही... पण हे असा होते.. आणि आपण यावर विचार करतो हे नक्कीच.. असा म्हणतात हर क्यून का जवाब नाही होता... पण बर्याचदा मन हो अशाच जवाब नसलेल्या प्रश्नाभोवती फेर धरून पिंगा घालत बसते... आणि या वादळातून आपली सुटका होणे कठीण होऊन बसते....

अशाच काहीशा अवघड मनस्थितीमध्ये आज सापडले आहे.. एखादी गोष्ट हरवली तर ती सापडेपर्यंत त्याचा शोध घेता येतो... पण नेमका काय हरवले आहे ह्याच्या पत्ता नसतान जर शोध घेत राहिलो तर.... उफ्फ्फ्फ  असा का होते........ खरच काही प्रश्नाची उत्तर हि कधीच मिळत नाही... आणि मन पण इतके वेडे असते कि त्याला अशाच प्रश्नाची उत्तर हवी असतात..... तुमच्यासोबत हि असा होते का?

Thursday, April 28, 2011

लग्न झाल्यावर सर्वात जास्त tension असते ते दोन मुख्य व्यक्तींना. एक म्हणजे सासूबाई आणि दुसरी म्हणजे सुनबाई. आजकाल टीवीच्या वाढत्या प्रभावामुळे दोघी आधीपासूनच आपापली आयुध सज्ज करून मैदानात उतरतात. गमंत अशी असते कि दोघींना ही एकमेकींशी स्पर्धा करायची असते, ज्याला वास्तविक काही अर्थच नसतो पण तरी सुद्धा झुकत माप घेण्यासाठी कोणीही तयार नसते... का? हा प्रश्न मला हल्ली जास्त सतवायला लागला आहे. 
बऱ्याचा सासूबाई अशी मानसिकता असते की जे माझ्या सासूबाईनी   माझ्याकडून करून घेतले आहे ते मी सुद्धा माझ्या सुनेकडून करून घेणार... हा असा विचार करण्यात काही गैर नाही .. हा मनुष्याचा स्वभावाच आहे... जे आपण केले ते समोरच्या माणसाकडून आपण करून घ्यायचे.. ही मानसिकता  तुमची आणि माझी सुद्धा आहे.. मनुष्यप्राणी म्हटल्यावर या आशा आणि अपेक्ष्यांचे  ओझे आपण समोरच्या माणसावर लादणारच ... का तर आपल्यावर हे ओझ कुणीतरी लादेले होते म्हणून...

किती वेडे  असतो ना आपण... जी गोष्ट आपल्यावर लादलेली  आपल्याला आवडत नाही तीच गोष्ट आपण समोरच्या माणसावर लादण्याचा प्रयत्न करतो... 

सासू सुनेचे नाते हे येथे एक उदाहरण म्हणून दिले  आहे.. कारण सर्वात जास्त आशा आणि अपेक्षा या नात्यातच असतात. सासूबाई या परंपरेने चालवत आलेल्या रूढी सांभाळत असतात आणि सुनबाई या globalization च्या नव्या प्रवाहातल्या असल्यामुळे या सर्व गोष्टी त्यांना बंधनकारक वाटतात... त्यांना स्वतःचे स्वतंत्र हिरावून घेतल्यासारखे वाटते... आणि आपल्यावर खूप जास्त अन्याय होतो आहे असे त्यांना वाटते .... आणि  सासूबाईना  या नव्या अवतारातील सुनेचे बंड पचून घ्यायला  जमत नाही... कारण दोघीनाही स्वतःही अशी ठाम मत असतात आणि एकीलाही आपली मत सोडायची नसते....

पण मला असो वाटते की ५० ते ६० वर्ष्यांच्या  सासूबाई  मतपरिवर्तन करण्यापेक्ष्य सुनेने स्वतः थोडेसे झुखावे... याचा अर्थ असा होत नाही की तिने संपूर्णपणे वाकावे... पण शक्य असेल तिथे जरूर.. शेवटी हा प्रत्येकाचा सर्वस्वी प्रश्न आहे... प्रत्येकाची मत ही माझ्य्याशी सहमत असतीलच असं नाही पण यावर तुम्ही सर्वांनी विचार करावा अशी माझी इच्छा आहे.

सासू कितीही चांगली असली तरी तिला आई बनता येते असे नाही त्याचप्रमाणे सून किती ही चांगली असली तरी तिलासुद्धा मुलगी बनता येतेच असे नाही.. पण तरीसुद्धा दोघीजणी हा प्रयत्न नक्कीच करत असतात ... आपल्यापैकी काही जण पुढे जाऊन या आई मुलीच्या नात्यापार्यंतर पोहोचले असतील... अशा सर्वांचे मनापासून अभिनंद...

आणि बाकी सर्वाना ALL THE  BEST  :)

Wednesday, April 27, 2011

आयुष्य कधीतरी इंद्रधानुश्यासारखे भासते. इतके वळण घेत आयुष्य जात असते. हे एका ठराविक उंचीवर पोहोचल्यावर दिसते. आज मलाही या वळणाचा नव्याने परिचय झाला. काही लोक फक्त काही क्षणांसाठी आपल्या आयुष्यात येतात , पण त्यामुळे आपले संपूर्ण आयुष्याच ढवळून निघते . त्यांची ये जा आयुष्यात चालूच असते. एक मित्र म्हणून आपण त्यांच्याशी बोलतो, नव्याने पुन्हा नात्याला सुरुवात करतो, पण गंमत अशी असते कि ते नाते नव्याने फक्त आपल्यापुरतेच चालू झालेले असते. समोरची व्यक्ती मात्र जुन्या नात्याचेच धागे पकडून बसलेली असते. अशावेळी आपल्याल्या अशा नात्यांना न्याय देणे कठीण होऊन बसते. प्रतेय्क माणूस हा नेहेमी मनामध्ये दोन कप्पे करून चालत असतो. एक कप्पा वर्तमान काळासाठी आणि दुसरा भूतकाळसाठी.बऱ्याचद भूतकाळ हा रम्य आठवणी देणारा असतो, पण काही माणसांची आठवण काढली तर फक्त आणि फक्त मनाला टोचणार्या वेदनाच होतात.