अस अचानक काहीतरी घडते आणि आयुष्य एका क्षणात बदलते... आणि गम्मत अशी असते की
हा एवढा मोठा बदल घडत असताना हे आपल्यासोबत होणार आहे याची पुसटशी कल्पना देखील
आपल्याला नसते... आपण सगळेच अनभिज्ञ असतो या बदलापासून... आपल्यापैकी
प्रत्येकाच्या आयुष्यात हे असे घडले असेल किंवा घडणार असेल.... पण या बदलाच्या
प्रक्रियेतून प्रत्येकाला जावे लागतेच.... कधी हे बदल चांगले असतात तर कधी
वाईट....कधी हसवणारे तर कधी रडवणारे... पण आपल्या मर्जीने किंवा मर्जी विरोधात बदल
हे घडत असतात... आणि आपल्या आयुष्याला एक नवा रूप आणि नवा वळण देत असतात.... कधी
कधी हा बदल स्वीकारणे सोपे असते तर कधी कठीण... पण जशी जशी वेळ सरत जाते आपणही या
बदलना सरसावत जातो... पण एक सांगू हे अशा प्रकारचे बदल घडणे आयुष्याला एक अर्थ देतो...
जो खूप गरजेचा असतो....
No comments:
Post a Comment