पोहे हा खाद्यपदार्थ म्हणून कितीही लोकप्रिय असला तरीही जेव्हा आयुष्याला कांदे पोहे ही उपमा दिली जाते तेव्हा थोडसं वेगळे वाटते. तुमच्याकडे पोह्यात(आयुष्यात) काय चालू आहे असा कोणी प्रश्न विचारला तर????? आणि नेमकी भुकेच्या वेळी तर मग मज्जच मज्जा.... जोक्स अपार्ट.... खरच आपल्यापैकी प्रतेकाचे आयुष्य हे कढईतले कांदे पोहेच आहे....कधी कधी प्रश्न पडतो की ज्याने गाणे लिहिले त्याने कांदेपोहेच का निवडले...... दुसरा कोणता पदार्थ का निवडला नाही....थोडासा विचार केल्यावर लक्षात आले की पोहे हे सर्वांचेच आवडते आहेत.... पोहे ना आवडणारा एखाद दुसराच.... म्हणूच ज्याने गाणे लिहिले त्याने सर्वांनाच नशिबाच्या कढईतल्या कांदे पोह्यांची उपमा दिली...
कुणाचे खमंग, कुणाचे करपलेले, कुणाचे तेल जास्त असलेले तर कुणाचे कोरडे...... कुणाचे तिखट.... कुणाचे अळणी .... कुणाच्या पोह्यात बटाटे तर कुणाच्या शेंगदाणे....तर काही जणाचे एकदम परफेक्ट.... आपल्या आजुबाजुच्याचे आयुष्य पहिले तर कांदे पोह्याचे कितीतरी प्रकार आपल्याला दिसतील...... खाताना सुद्धा पोह्याच्या जितक्या चवी समजल्या नसतील तितक्या चवी आपल्या आजूबाजूला आढळतात.... पोहे प्रत्येक घरी बनतात पण प्रत्येक घरची चव ही वेगळी असते... तसेच आपल्या आयुष्याचे ही असते.. राहायला एकत्र पण विचारांनी, स्वभावानी प्रत्तेक जण वेगळा .... प्रत्येक जण निराळा.... कुणी तिखट ... तर कुणी आंबट गोड....तर कुणी खरात... जो तो स्वतःला आवडेल तसे आपल्या आयुष्याचे कांदेपोहे बनवत असतो... आणि हवी तशी चव आणत असतो....
प्रत्येक जण एकमेकांच्या बशीतले कांदे पोहे खातात .. त्याला नाव ठेवतात... त्याची स्तुती करतात... कुणी मागून बोलतात तर कुणी तोंडावर पण एक चमचा का होईना ते तुमच्या आयुष्यातले कांदे पोहे खातात.... म्हणजेच कसे का होईना... कुणीही का होईना प्रत्येकाला दुसाऱ्याचे कांदे पोहे खाण्यात इंटरेस्ट हा असतोच असतो... आपण सर्वच जण या नशीब नावाच्या कढईत कांदे पोह्या सारखे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे होत असतो... कधी चटके बसतात... तर कधी मिरचीच्या फोडणीतून ठसका लागतो.... पण कांदा, मिरची, आले, लिंबू, हळद, कडीपत्ता, मीठ आणि थोडीशी साखर या सर्वाच्या एकजीव मिश्रणात जेव्हा पांढरे शुभ्र पोहे उडी मारतात तेव्हा सर्वच जण एकमेकांच्या रंगांत मिसळून जातात. आणि खमंग असे कांदे पोहे तयार होतात.... आपणही असेच आयुष्याच्या कढइत तावून सुलाखून निघत असतो.. आयुष्याचे वेगवेगळे रंग पाहत असतो त्यात मिसळत असतो.... आणि शेवटी प्रत्येकाला आलेल्या अनुभवावरून प्रत्येकाच्या कांदे पोह्याची चव ठरत असते.... माझे कांदे पोहे अजून शिजता आहेत.... तुमच्या कांदे पोह्याची चव कशी आहे...... ???????????????? J
No comments:
Post a Comment