आज् आपण २० व्या
शतकात्यला स्वतंत्र स्त्रिया म्हणून जगत आहोत. आज आपण आर्थिकरीत्त्या स्वतंत्र आहोत
पण वर्षानुवर्षे जखडलेला आपला समाज हा आजही परंपरा आणि चालीरीतीच्या नावाखाली
स्त्रियांची पिळवणूक करत आहे. का तर आपल्या देशात पुरुष प्रधान संस्कृती आहे
म्हणून... आणि स्त्रियांना जगताना समाजाने ज्या चौकटी आखून दिल्या आहेत त्याच
चौकटीत तीने वावरावे म्हणून... पाहायला गेले तर आपण स्त्री मुक्तीवाद किंवा या
सारख्या अवजड शब्दांचा उपयोग करतो पण
स्वतंत्रतेच्या नावाखाली आजची स्त्रियांच्या पायात कळत नकळतपणे असंख्य बेड्या
आहेत. असाच एक बंडखोर विचार मनात आला आहे... आज ह्या क्षणाला स्वतःला स्वतंत्र
म्हनुवून घेणाऱ्या किती स्त्रिया या खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे... आपल्या पैकी
किती जणींना स्वतःच्या अस्तित्वाचा शोध लागलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्या
स्वतःचे आयुष्य स्वतंत्रपणे जगत आहे...
समाजाला स्त्री
प्रत्येक अर्थाने सांभाळत असते. कधी आई , बहिण ,बायको, मुलगी तर कधी मैत्रीण या
नात्याने...पण हीच स्त्री जेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी लढते... स्वतःच्या
मागण्या समाजासमोर मांडते तेव्हा तिच्यावर स्वार्थी पणाचा ठपका का ठेवला जातो...स्त्री
ही प्रत्येक रुपात जर समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेते... तर तिच्या भावना
समजणारे कोणीही का नसते...मग स्त्री ही पूर्वीच्या काळातली असो किंवा आजच्या
काळातली तिच्या मनाला समजणारे कोणीही नसते... प्रत्येक वेळेस तडजोड आणि स्वतःचे मन
मारणे हे जणू स्त्रीचे जन्मजात हक्क असल्यासारखे पुरुष तिला वागवत असतात....
स्त्रीची सर्वात
जास्त कुचंबणा कुठल्या रुपात होत असेल तर ती आईच्या... असे मला वाटते... आई या रुपात
वावरताना एकीकडे तिला महान समजले जाते तर दुसऱ्या टोकाला तिच्या हातात असंख्य
जबाबदाऱ्या आणि तडजोड यांची भेटवस्तू दिली जाते. मुलांसाठी आपले सर्वस्व देताना या
आईला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो.. आशा , आकांक्षा आणि तिची स्वप्न ही
कुठल्याकुठे विरून जातात... स्त्रीला स्वतःचे अस्तित्वच उरत नाही... मुल म्हणजे
तिचे विश्व बनते.. आणि त्यांना घडवणे , एक चांगला माणूस बनवणे आणि समाजामध्ये एक
जबाबदार नागरिक बनविणे ह्या ओझ्याखाली तिची स्वप्ने विरून जातात... कधी एक काळी
स्वताचे कर्तुत्व गाजवणारी स्त्री ही ह्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दाबून जाते..
हरवून जाते... आणि हीच मुल मोठी झाल्यावर स्वतःच्या स्वप्नासाठी आईच्या मनाचा कणभर
ही विचार करत नाही...याला काही अपवाद सुदैवाने नक्कीच असतील अशी मला आशा आहे...
मी इथे मांडलेले विचार
हा सर्वाना पटेलच असा नाही आणि तशी कोणावरही जबरदस्ती देखील नाही... पण ‘मदर्स डे’
च्या निमित्ताने आपल्या पैकी सर्वाना हे खूप मनापासून सांगावेसे वाटते की ...
आपल्या आईला तर सन्मान द्या पण त्याच बरोबर तिच्यातल्या स्त्री चा देखील सन्मान
करा... कधीतरी वेळ काढून तिची स्वप्न आणि आकांक्षा जाणून घ्या... त्या एक
दिवसापुरते तरी आईच्या आतमधील स्त्रीला मुक्तपणे जगू द्या... आज मी एक मुलगी आहे...
एक बायको आहे ..... कालांतराने आई होणार आहे...पण मला माझ्यातल्या आशा आणि
आकांक्षा इतरांनसारख्या वाऱ्यावर नाही सोड्याच्या आहेत.. मला माझी स्वप्न जगायची आहेत...
पण माहिती नाही...परिणामी याचा अंत काय होणार आहे... मी ही इतरांसारखी चौकटीत
आयुष्य जगणार आहे की जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या स्वप्नांना देखील आकार देणार
आहे.....
No comments:
Post a Comment