‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...’
आपल्यापैकी प्रत्येकाने हे गाण ऐकले असेल असं मी गृहीत धरते.. (मला स्वत:ला कुणीही
गृहीत धरलेलं आवडत नाही.. तुम्हा सर्वाना परवानगीशिवाय गृहीत धरल म्हणून सॉरी) पण
याचा जरा मोकळेपणाने विचार करा.. की आपल्यापैकी प्रत्येकजण खरच जगण्यावर प्रेम
करतो का? हल्ली लोक स्वत:ची बायको असतानाही दुसऱ्याच्या बायकोवर प्रेम करतात.. पण
स्वत:वर प्रेम करत नाही.. का? याचं कारण शोधण्याचा आपल्यापैकी कितीजण प्रयत्न
करतात.... कदाचित कुणीही नाही... कदाचित कुणीतरी... नक्की आकडा सांगता येणार
नाही.. आणि सारख सारख मी गृहीत धरलेलं तुम्हाला देखील चालणार नाही.. हे माहिती आहे
मला..
पण मधल्या काही काळत थोडा निवांत वेळ मिळाला या सर्व
गोष्टीवर विचार करण्याचा... आपल्यापौकी कितीजण स्वत:च्या आयुष्यावर प्रेम करतात...
कदाचित आपल्या मनात हा प्रश्न येईल की म्हणजे नेमक काय?? तर तुमच्या मनात येईल
तेव्हा तुम्ही मोकळेपणाने हसता का? कधीतरी जे मनाला पटेल ती गोष्ट तुम्ही बाकीचे
काय म्हणतील हा विचार न करता करतात का? कधीतरी संध्याकाळी समुद्र किनारी बसून
स्वत;ची दु;ख स्वत:चा आनंद निसर्गाशी शेअर करता का? कधीतरी बर्फाची कॅन्डी सुर्रर्र
असा आवाज करून खाता का? आवडीच पुस्तक कधीतरी वेळ काढून वाचता का? आपल्या जुन्या
मित्रांशी तासनतास गप्पा मारता का? कधीतरी काहीतरी नवीन करून पाहता का... यादी खूप
मोठी आहे... यातलं कदाचित काही मी मिस्स केलं ही असेन... तर माझ्यामते समाजाल
वेड्या वाटणाऱ्या पण स्वत:च्या मनाला पटणाऱ्या गोष्टी आपल्यापैकी कितीजण करतात?
यादी मोठी... आणि प्रश्नांची उत्तर खरं तर खूप
करावसं वाटत पण वेळच मिळत नाही किंवा लोक काय म्हणतील यापैकी एखादं असेल... पण
आपल्याला पटणाऱ्या आवडणाऱ्या गोष्टी न करता फालतू गोष्टीवर विचार करत आयुष्य का
घालवावं ... का विचार करावा जगाचा आणि समाजाचा.. जेव्हा आपल्याला जगण्यासाठी लागणारे
श्वास आपण घेतो.. कुणा दुसर्याला घ्यायला सांगत नाही त्याचप्रमाणे आपल्याला
आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी का दुसर्यचा विचार का करावा.. स्वत: पडून धडपडून उभं
रहाण्याची क्षमता असताना का दुसरा कुणी आपल्याला सांभाळेल ही आशा धरावी... आयुष्य
बिनधास्तपणे का जगू नये..
चिंब चिंब पावसात भिजताना लोक काय म्हणतील या
पेक्षाही जेव्हा तो अंगावर झेलणारा पाउस आपण अनुभवू त्या क्षणी आपण खऱ्या अर्थाने
जगण्यावरचं प्रेम अनुभवू... पुन्हा एकदा प्रेम करू.. पुन्हा एकदा प्रेमात
पडण्यासाठी..
प्रेम व्यक्त करण किती अवघड असत.��
ReplyDelete