Saturday, May 7, 2011

आई ....


सांगता  येणार नाही आई मला , रोज तुझी किती आठवण येते..
रोज रात्री थकून घरी आल्यावर... तुझी कुशी आजही आठवते..
जेव्हा वाटते शांत झोप हवी आहे.. तेव्हा तुझी मांडी आठवते...
दिवस वाईट गेला कि तुझी हळवी मिठी आठवते...
आणि आनंदाच्या क्षणी  तुझ्या डोळ्यात येणारे पाणी आठवते...
कसा सांगू तुला आई, रोज तुझी किती आठवण येते...

मी फोने केला नाही कि तू कासावीस होतेस...
आणि फोन केल्यावर काळजीपोटी तू मला ओरडतेस..
तुझ्या ओरडण्यामागाचे  प्रेम मला जास्त आवडते...
कसा सांगू तुला आई, रोज तुझी किती आठवण येते...

जेव्हाही वाटते  कि हे अशक्य आहे..
तेव्हा फक्त तूच धीर देताना आठवतेस...
माझ्या प्रत्येक संकटात देवापुढे  तू प्रार्थना करते...
तुझे आशीर्वादाच मला लढायची ताकद देतात..
रोज रात्री तुझ्या प्रार्थना माझ्यापर्यंतर  पोहोचवतात...

खरा सांगते आई ... पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे...
सगळी दु:ख विसरून तुझ्या कुशीत निवांत झोपायचे आहे...
पुन्हा एकदा तुझ्या कडेवर बसून..हे जग पहायचे आहे..
आई मला पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे... 
तुझ्या गळ्यात पडून पुन्हा... तुझी किती आठवण येते ते सांगायचे आहे...

2 comments:

  1. सुंदर कविता ............आई व मुल यांच्या भेटीची उत्कटता ........विशेष म्हणजे आधुनिक पिढीची भावना , प्रसंग अचूक टिपले आहेत .........

    ReplyDelete