Saturday, May 5, 2012

एक स्त्री म्हणून.....


आज् आपण २० व्या शतकात्यला स्वतंत्र स्त्रिया म्हणून जगत आहोत. आज आपण आर्थिकरीत्त्या स्वतंत्र आहोत पण वर्षानुवर्षे जखडलेला आपला समाज हा आजही परंपरा आणि चालीरीतीच्या नावाखाली स्त्रियांची पिळवणूक करत आहे. का तर आपल्या देशात पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हणून... आणि स्त्रियांना जगताना समाजाने ज्या चौकटी आखून दिल्या आहेत त्याच चौकटीत तीने वावरावे म्हणून... पाहायला गेले तर आपण स्त्री मुक्तीवाद किंवा या सारख्या  अवजड शब्दांचा उपयोग करतो पण स्वतंत्रतेच्या नावाखाली आजची स्त्रियांच्या पायात कळत नकळतपणे असंख्य बेड्या आहेत. असाच एक बंडखोर विचार मनात आला आहे... आज ह्या क्षणाला स्वतःला स्वतंत्र म्हनुवून घेणाऱ्या किती स्त्रिया या खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे... आपल्या पैकी किती जणींना स्वतःच्या अस्तित्वाचा शोध लागलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्या स्वतःचे आयुष्य स्वतंत्रपणे जगत आहे...

समाजाला स्त्री प्रत्येक अर्थाने सांभाळत असते. कधी आई , बहिण ,बायको, मुलगी तर कधी मैत्रीण या नात्याने...पण हीच स्त्री जेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी लढते... स्वतःच्या मागण्या समाजासमोर मांडते तेव्हा तिच्यावर स्वार्थी पणाचा ठपका का ठेवला जातो...स्त्री ही प्रत्येक रुपात जर समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेते... तर तिच्या भावना समजणारे कोणीही का नसते...मग स्त्री ही पूर्वीच्या काळातली असो किंवा आजच्या काळातली तिच्या मनाला समजणारे कोणीही नसते... प्रत्येक वेळेस तडजोड आणि स्वतःचे मन मारणे हे जणू स्त्रीचे जन्मजात हक्क असल्यासारखे पुरुष तिला वागवत असतात....

स्त्रीची सर्वात जास्त कुचंबणा कुठल्या रुपात होत असेल तर ती आईच्या... असे मला वाटते... आई या रुपात वावरताना एकीकडे तिला महान समजले जाते तर दुसऱ्या टोकाला तिच्या हातात असंख्य जबाबदाऱ्या आणि तडजोड यांची भेटवस्तू दिली जाते. मुलांसाठी आपले सर्वस्व देताना या आईला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो.. आशा , आकांक्षा आणि तिची स्वप्न ही कुठल्याकुठे विरून जातात... स्त्रीला स्वतःचे अस्तित्वच उरत नाही... मुल म्हणजे तिचे विश्व बनते.. आणि त्यांना घडवणे , एक चांगला माणूस बनवणे आणि समाजामध्ये एक जबाबदार नागरिक बनविणे ह्या ओझ्याखाली तिची स्वप्ने विरून जातात... कधी एक काळी स्वताचे कर्तुत्व गाजवणारी स्त्री ही ह्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दाबून जाते.. हरवून जाते... आणि हीच मुल मोठी झाल्यावर स्वतःच्या स्वप्नासाठी आईच्या मनाचा कणभर ही विचार करत नाही...याला काही अपवाद सुदैवाने नक्कीच असतील अशी मला आशा आहे...

मी इथे मांडलेले विचार हा सर्वाना पटेलच असा नाही आणि तशी कोणावरही जबरदस्ती देखील नाही... पण ‘मदर्स डे’ च्या निमित्ताने आपल्या पैकी सर्वाना हे खूप मनापासून सांगावेसे वाटते की ... आपल्या आईला तर सन्मान द्या पण त्याच बरोबर तिच्यातल्या स्त्री चा देखील सन्मान करा... कधीतरी वेळ काढून तिची स्वप्न आणि आकांक्षा जाणून घ्या... त्या एक दिवसापुरते तरी आईच्या आतमधील स्त्रीला मुक्तपणे जगू द्या... आज मी एक मुलगी आहे... एक बायको आहे ..... कालांतराने आई होणार आहे...पण मला माझ्यातल्या आशा आणि आकांक्षा इतरांनसारख्या वाऱ्यावर नाही सोड्याच्या आहेत.. मला माझी स्वप्न जगायची आहेत... पण माहिती नाही...परिणामी याचा अंत काय होणार आहे... मी ही इतरांसारखी चौकटीत आयुष्य जगणार आहे की जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या स्वप्नांना देखील आकार देणार आहे.....

Thursday, December 22, 2011

सिक्रेट सान्ता



डिसेंबर महिन्याची १५ तारीख उलटली की नाताळ सणाची ओढ लागते. लहान मोठे सर्वचजण नाताळ सणाची आणि आपली आवडत्या सान्ताची आणि खासकरून सान्ताकडून मिळणाऱ्या गिफ्टची वाट बघत असतात. आपण कितीही मोठे झालो तरी नातळची क्रेझ ही लहान मुलांपासून ती वयस्कर अजोबांपर्यंतर सर्वांमध्येच सारखीच असते. आणि डिसेंबर महिना सुरु झाल्यावर प्रत्येकजण उत्सुकतेने वाट बघतो ती नाताळची..

नाताळच्या निमित्ताने बाजारपेठेत अनेक गिफ्ट्सचे विकल्प उपलब्ध असतात. पण स्वतःसाठी काही विकत घेण्यापेक्षा सांताक्लॉसच्या हातून मिळालेले गिफ्ट जास्त आवडतात.. लहानपणी उशीखाली मोजा ठेऊन झोप्याची सवय हळूहळू मोठे झाल्यावर कुठेतरी हरवत जाते खरी पण मनाच्या एका कोपर्यात आपण नेहेमीच सांताक्लॉसची वाट पाहत असतो.. रोज रोज ऑफिसला गेल्यावर टेबलावर समोर दिसणार काम्पुटर आणि फाईल्स इतक्या सवईच्या झालेल्या असतात की दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनतात. तुमच्या माझ्या डेली रुटीनचा हा एक भागआहे.. थोडाफार फरक असेल कदाचित... काय बरोबर ना !  या सर्वातून थोडीशी सुटका मिळते ती दिवाळी आणि नाताळ सनाच्या निमित्ताने.. दिवाळीत तर सर्वच ऑफिसमध्ये ट्रेडीशनल डे साजरा केला जातो.. पण नाताळच्या निमित्ताने कॉर्पोरेटसने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळा आणि मजेदार उपक्रम आयोजित केला आहे.

सध्या सर्वच कॉर्पोरेटसमध्ये नाताळच्या निमित्ताने सिक्रेट सान्ता ही कॉनसेप्ट अस्तित्वात आणली आहे. हा सिक्रेट सान्ता कोण असेल बरं ! तर हा ऑफिसमधला आपलयाच कर्मचाऱ्यांपैकी एक असतो.  ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नावाच्या चिठ्या काढल्या जातत आणि प्रत्येकाला एक एक चिठी उचलायला सांगितली जाते.  कोणाचे नाव कोणाल आले आहे  हे फक्त त्या व्यक्ती खेरीज दुसऱ्या कोणालाही ते नाव सांगण्यास मनाई असते. नाताळच्या दिवशी सिक्रेट सान्ताने त्या व्यक्तीसाठी सिक्रेटली गिफ्ट ठेवायचे असते.. खरच कामाच्या रोजच्या रामरगाड्यात अशाप्रकारे सिक्रेट सान्ताकडून मिळालेले गिफ्टची मज्जा काही औरच असते..लहानपणी उशीखाली मोजा ठेऊन झोपायची मज्जा आणि मोठे झाल्यावर ओफिस डेस्कवर सिक्रेट सान्ताकडून मिळालेले गिफ्ट या दोन्ही क्षणांचा आनंद हा अवर्णनीय असतो... कितीही मोठे झालो तरी आपल्या मनात एक लहान मुल असते असा म्हणतात... या अशा क्षणी आपल्यातल्या प्रत्येकाला लहानपण जगल्याचा आनंद पुन्हा मिळतो... आपल्याच ऑफिसमधील आपल्या सहकार्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचे आहे हा अनुभव खूप वेगळा असतो... कारण फक्त कामाच्या निमित्ताने ज्याच्याशी रोज बोलले जाते त्याला कामाच्या चौकटीबाहेर जाऊन काहीतरी द्यायचे आहे हे नकळतच कार्माचार्यामधील ऋणानुबंध अधिक घट्ट करतात. यासाठी काही वेगळे ट्रेनिग प्रोग्राम घ्यावे  लागत नाही...

आयुष्यात पुढे जाताना, यशाची मोठी मोठी शिखर गाठताना आशा प्रकारचे छोटे छोटे पण अविस्मरणीय क्षण खूप मोलाचे ठरतात...रोजच्या रुटीन आयुष्याला नवीन प्रकारची संजीवनी देऊन जातात.. ऑफिसच्या टेबलावर ठेवल्या जानार्या फाईल्स आणि कम्प्युटर समोरच्या जागेवर एक दिवस सिक्रेट सान्ताच्या गीफ्टचा असतो...आणि खरा सांगायचे तर ३६५दिवसांपैकी टेबलवर असणाऱ्या फाईल्स एक दिवस असणारे सिक्रेट सान्ताचे गिफ्ट खूप खूप महत्वाचे असते...

मग आता नाताळ जवळ येतो आहे... आत तुमच्या ही मनात सिक्रेट सान्ताबद्दल ओढ निर्माण झाली असेल.. मी तर खूप एक्सआईटेड आहे सिक्रेट सान्ताकडून गिफ्ट घेण्यासाठी.. आणि तुम्ही पण नक्कीच असाल.. पण गिफ्ट घेण्याच्या नादात तुम्ही स्वतही कोणाचे तरी सिक्रेट सान्ता बनायला विसरू नका... जो आनंद तुम्हाला कोणीतरी देणार आहे... तो आनंद तुम्ही देखील कोणालातरी द्या... 

Saturday, October 8, 2011


अस अचानक काहीतरी घडते आणि आयुष्य एका क्षणात बदलते... आणि गम्मत अशी असते की हा एवढा मोठा बदल घडत असताना हे आपल्यासोबत होणार आहे याची पुसटशी कल्पना देखील आपल्याला नसते... आपण सगळेच अनभिज्ञ असतो या बदलापासून... आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात हे असे घडले असेल किंवा घडणार असेल.... पण या बदलाच्या प्रक्रियेतून प्रत्येकाला जावे लागतेच.... कधी हे बदल चांगले असतात तर कधी वाईट....कधी हसवणारे तर कधी रडवणारे... पण आपल्या मर्जीने किंवा मर्जी विरोधात बदल हे घडत असतात... आणि आपल्या आयुष्याला एक नवा रूप आणि नवा वळण देत असतात.... कधी कधी हा बदल स्वीकारणे सोपे असते तर कधी कठीण... पण जशी जशी वेळ सरत जाते आपणही या बदलना सरसावत जातो... पण एक सांगू हे अशा प्रकारचे बदल घडणे आयुष्याला एक अर्थ देतो... जो खूप गरजेचा असतो....


बऱ्याचदा काही गोष्टी या काही ना काही कारण घेऊन घडत असतात... त्या का घडतात, कशासाठी घडतात त्यामागे काहीच कारण असणे गरजेचे असते असे नाही... कदाचित काहीही करणान नसताना घडण्याची वेळ आलेली असते म्हणून त्या गोष्टी कदाचित घडत असतील... पण आजपर्यंतर ज्या गोष्टी काळाच्या पडद्याआड असतात त्या अचानक ध्यानी मनी नसताना का घडाव्यात.... हे अजूनही एक कोडे आहे.... प्रत्येक गोष्टीला काही तरी कारण असते असे म्हणतात... मग काही गोष्टी अवेळी आणि बिना करणाच्या का घडाव्यात.... काही प्रश्न आयुष्यात अनुत्तरीत राहिलेले बरे असतात.... कारण त्यांची जर उत्तरं मिळाली तर कदाचित जास्त दुरावे निर्माण होण्याची शक्यता असते.... 

Thursday, August 4, 2011

असच काहीतरी..... सहज वाटले म्हणून ....


काहीतरी नवीन घडावे असे रोज वाटत असते... पण नक्की काय घडावे हे माहिती नसते.... काहीतरी बदल हवा असतो.... रोजच्या जगण्यापेक्षा काहीतरी वेगळे हवे असते.. पण काय हे माहिती नाही.... मला  वरचे वर असे वाटते आहे की काहीतरी भन्नाट असा घडावे..... पण काय??? हा विचार आला की मी थांबते..... अशी अवस्था तुमची पण असेल... तेच तेच रुटीन जागून तुम्हालाही कंटाळा आला असेलच.... आपण किती वेडे असतो ना... आपल्याला नेहेमी वाटते की काहीतरी बदल घडावा.... काहीतरी वेगळे व्हावे.... पण नेमकेपणे काय हवे आहे हेच माहिती नसते.... कधी कधी आभाळ भरून आल्यवर वाटते की हा पाऊस फक्त माझ्यासाठी का पडत नाही... उन्हातून चालताना वाटते की थोडीशी सावली फक्त माझ्या डोक्यावर का येत नाही... समुद्र किनारी बसल्यावर वाटते की हा समुद्र माझ्याशी का बोलत नाही... आणि वार्याची झुळूक आली की असे वाटे की मला असा का उडता येत नाही.... असे अनेक वास्तवतेत कधीही न होऊ शकणाऱ्या गोष्टीचा विचार करतो आपण..... मनाला थोडावेळ का होईना थोडासा विरंगुळा देतात म्हणून करतो... की मनाला समाधान मिळावे म्हणून.... हल्ली हे अस नेहेमीचाच झाला आहे... कधी ही काहीही वाटते.. का वाटते ,कशाला वाटते नाही सांगता येत.... पण वाटते.... बसल्या बसल्या एक असाच विचार मनात आला की आपल्याला आयुष्याकडून नक्की काय हवा आहे... चौकटीत आखून दिल्याप्रमाणे आयुष्य नाही जगायचे आहे.. कारण आपण ठरवलेल्या गोष्टी होतीलच असे नाही... आपण निश्चित ठिकाणी पोहोचू असे नाही.... पोहोचलो तरी ठरवलेल्या वेळेत पोहोचू असे नाही... आणि ठरवलेल्या वेळेत पोहोचलो तरी जे हवे आहे ते तेव्हा मिळेलच असेही नाही.... आयुष्य नावाच्या गीफ्टचे  प्लॅनिइंग करता येत नाही ... कारण पुढच्या क्षणाची शाश्वती नसते... येणार क्षण आपल्याला हवाल तसं असेलच याची खात्री नसते.... तरी ही आपण आयुष्यावर प्रेम करतो... खूप जास्त प्रेम करतो....पुढच्या क्षणाची परवा करायची नाही असे ठरवले तरी ही जीवन विमा  पॉलिसी काढतो....  हवा तसं जगायचे ठरवले तरी नोकरीसाठी बांधील राहतो.... आभाळात उडायची स्वप्न बघताना पायात लोखंडी साखळदंड बांधतो.... कितीही स्वतःला स्वतंत्र म्हटले तरीही कुठे ना कुठे जखडून ठेवतो...
कधी कधी असे वाटते की आरशासारखे मन घासून पुसून चकचकीत का करता येत नाही... जे मनात आहे ते समोरच्या माणसाला का सांगता येत नाही... असे वागलो तर नाती जस्त वेळ नाही की टिकून राहणार... लोणच बराच वेळ टिकायला आपण त्यात तेल आणि मिठ घालतो..... मग नाती टिकवायला का कोणी कुठचे उपाय करत नाही....स्वतःचे स्टेटस माणसे जपतात.. अहंकार जपतात.... राग रुसवे जपतात.. पण नाती का जपत नाही..... कोणी वाईट बोलले तर जन्मभर लक्षात ठेवतो.... पण चांगले वागले तर कोणाच्या का लक्षात राहत नाही....  माणूस हा एक विचित्र प्राणी आहे... त्याच्या अशा आणि अपेक्षा कधी संपत नाही.....  बदल हवा असतो पण बदल घडवण्याची मानसिकता नसते... काहीतरी करायचे असते... पण करण्याची हिम्मत नसते..... आणि स्वप्ना बघायची असतात पण टी पेलवण्याची ताकद नसते.... आपण सर्वही असेच आहोत.... असा नही वाट का की थोडासा बदलायला हवे... बदल होण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे...
 माझा प्रवास सुरु झाला आहे... तुमचा काय... निघालात की अजूनही विचारच करता आहात?????.... J

Wednesday, August 3, 2011

आयुष्य हे कढईतले कांदे पोहे ......


पोहे हा खाद्यपदार्थ म्हणून कितीही लोकप्रिय असला तरीही जेव्हा आयुष्याला कांदे पोहे ही उपमा दिली जाते तेव्हा थोडसं वेगळे वाटते. तुमच्याकडे पोह्यात(आयुष्यात) काय चालू आहे असा कोणी प्रश्न विचारला तर????? आणि नेमकी भुकेच्या वेळी तर मग मज्जच मज्जा.... जोक्स अपार्ट.... खरच आपल्यापैकी प्रतेकाचे आयुष्य हे कढईतले कांदे पोहेच आहे....कधी कधी प्रश्न पडतो की ज्याने गाणे  लिहिले त्याने कांदेपोहेच का निवडले...... दुसरा कोणता पदार्थ का निवडला नाही....थोडासा विचार केल्यावर लक्षात आले की पोहे हे सर्वांचेच आवडते आहेत.... पोहे ना आवडणारा एखाद दुसराच.... म्हणूच ज्याने गाणे लिहिले त्याने सर्वांनाच नशिबाच्या कढईतल्या कांदे पोह्यांची उपमा दिली...
कुणाचे खमंग, कुणाचे करपलेले, कुणाचे तेल जास्त असलेले तर कुणाचे कोरडे...... कुणाचे तिखट.... कुणाचे अळणी .... कुणाच्या पोह्यात बटाटे तर कुणाच्या शेंगदाणे....तर काही जणाचे एकदम परफेक्ट.... आपल्या आजुबाजुच्याचे आयुष्य पहिले तर कांदे पोह्याचे कितीतरी प्रकार आपल्याला दिसतील...... खाताना सुद्धा पोह्याच्या जितक्या चवी समजल्या नसतील तितक्या चवी आपल्या आजूबाजूला आढळतात.... पोहे प्रत्येक घरी बनतात पण प्रत्येक घरची चव ही वेगळी असते... तसेच आपल्या आयुष्याचे ही असते.. राहायला एकत्र पण विचारांनी, स्वभावानी प्रत्तेक जण वेगळा .... प्रत्येक जण निराळा.... कुणी तिखट ... तर कुणी आंबट गोड....तर कुणी खरात... जो तो स्वतःला आवडेल तसे आपल्या आयुष्याचे कांदेपोहे बनवत असतो... आणि हवी तशी चव आणत असतो....
प्रत्येक जण एकमेकांच्या बशीतले कांदे पोहे खातात .. त्याला नाव ठेवतात... त्याची स्तुती करतात... कुणी मागून बोलतात तर कुणी तोंडावर पण एक चमचा का होईना ते तुमच्या आयुष्यातले कांदे पोहे खातात.... म्हणजेच कसे का होईना... कुणीही का होईना प्रत्येकाला दुसाऱ्याचे कांदे पोहे खाण्यात इंटरेस्ट हा असतोच असतो... आपण सर्वच जण या नशीब नावाच्या कढईत कांदे पोह्या सारखे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे होत असतो... कधी चटके बसतात... तर कधी मिरचीच्या फोडणीतून ठसका लागतो.... पण कांदा, मिरची, आले, लिंबू, हळद, कडीपत्ता, मीठ आणि थोडीशी साखर या सर्वाच्या एकजीव मिश्रणात जेव्हा पांढरे शुभ्र पोहे उडी मारतात तेव्हा सर्वच जण एकमेकांच्या रंगांत मिसळून जातात. आणि खमंग असे कांदे पोहे तयार होतात.... आपणही असेच आयुष्याच्या कढइत तावून सुलाखून निघत असतो.. आयुष्याचे वेगवेगळे रंग पाहत असतो त्यात मिसळत असतो.... आणि शेवटी प्रत्येकाला आलेल्या अनुभवावरून प्रत्येकाच्या कांदे पोह्याची चव ठरत असते.... माझे कांदे पोहे अजून शिजता आहेत.... तुमच्या कांदे पोह्याची चव कशी आहे...... ???????????????? J

Thursday, June 16, 2011

Every relation is concept.... Every individual is reality....


Every relation is concept.... Every individual is reality....


वर वर पाहता एक छोटस वाक्य पण अख्या आयुष्याचा अर्थ यात लपलेला आहे. खरच एखाद्या नात्यामध्ये जेव्हा आपण गुंततो तेव्हा बऱ्याचदा आपण एक चूक करतो.. माहिती आहे कोणती.. जरा विचार करा.. समजली... ठीक आहे..सांगते ...आपण समोरच्याला गृहीत धरण्याची चूक करतो.... हो.. बऱ्याच गोष्टींसाठी आपण आपल्याच माणसाना गृहीत धरतो... आपण मुद्दामून काही करत नाही.. हे ओघात होऊन जातो.. नेहेमी आपणच करतो असा नाही.. आपल्यासोबतही असे होते.. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला असे नात्याच्या तराजुत आपण सगळेच जण तळ्यात मळ्यात खेळत असतो...

ह्म्म्म ...आयुष्याची एक खरी बाजू अशी समोर आल्यावर कुणीतरी जागा केल्यासारखा वाटले का..? पण हे वास्तव आहे.. आपण 
कळत नकळत या गोष्टी कधी करतो तर कधी या गोष्टीना सामोरे जातो... माहिती आहे का कारण आपण नात्याला महत्त्व देतो... नात्यामध्ये असणाऱ्या त्या व्यक्तीला नाही... त्या व्यक्तीच्या भावनांना नाही... कोणतेही नाते तेव्हाच यशस्वी होते जेव्हा त्या नात्यामधले दोघही एकमेकांना समजतात म्हणजे काय करतात तर ते दोघेही नात्यापेक्षा एकमेकांच्या भावनांना महत्व देतात... खरा सांगू तर शब्द मांडता येत नाहीये... कुठेतरी काहीतर निसटून जाते आहे असे वाटते ..पण एक गोष्ट मात्र नक्की की कोणतेही नाते निभावताना त्यातल्या समोरच्या माणसाच्या भावना समजून घ्या ... त्यानाही महत्त्व द्या.. मग ते नाते कोणतेही असो... आई मुलाचे , नवरा बायकोचे, भाऊ बहिणीचे किवा मित्रांचे... शेवटी.. आपल्यालाही कुणीतरी खऱ्या अर्थाने समजून घ्यावे असे वाटते ना.... Every relation is concept.... Every individual is reality.... so respect each other's individuality in relationship