Thursday, December 22, 2011

सिक्रेट सान्ता



डिसेंबर महिन्याची १५ तारीख उलटली की नाताळ सणाची ओढ लागते. लहान मोठे सर्वचजण नाताळ सणाची आणि आपली आवडत्या सान्ताची आणि खासकरून सान्ताकडून मिळणाऱ्या गिफ्टची वाट बघत असतात. आपण कितीही मोठे झालो तरी नातळची क्रेझ ही लहान मुलांपासून ती वयस्कर अजोबांपर्यंतर सर्वांमध्येच सारखीच असते. आणि डिसेंबर महिना सुरु झाल्यावर प्रत्येकजण उत्सुकतेने वाट बघतो ती नाताळची..

नाताळच्या निमित्ताने बाजारपेठेत अनेक गिफ्ट्सचे विकल्प उपलब्ध असतात. पण स्वतःसाठी काही विकत घेण्यापेक्षा सांताक्लॉसच्या हातून मिळालेले गिफ्ट जास्त आवडतात.. लहानपणी उशीखाली मोजा ठेऊन झोप्याची सवय हळूहळू मोठे झाल्यावर कुठेतरी हरवत जाते खरी पण मनाच्या एका कोपर्यात आपण नेहेमीच सांताक्लॉसची वाट पाहत असतो.. रोज रोज ऑफिसला गेल्यावर टेबलावर समोर दिसणार काम्पुटर आणि फाईल्स इतक्या सवईच्या झालेल्या असतात की दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनतात. तुमच्या माझ्या डेली रुटीनचा हा एक भागआहे.. थोडाफार फरक असेल कदाचित... काय बरोबर ना !  या सर्वातून थोडीशी सुटका मिळते ती दिवाळी आणि नाताळ सनाच्या निमित्ताने.. दिवाळीत तर सर्वच ऑफिसमध्ये ट्रेडीशनल डे साजरा केला जातो.. पण नाताळच्या निमित्ताने कॉर्पोरेटसने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळा आणि मजेदार उपक्रम आयोजित केला आहे.

सध्या सर्वच कॉर्पोरेटसमध्ये नाताळच्या निमित्ताने सिक्रेट सान्ता ही कॉनसेप्ट अस्तित्वात आणली आहे. हा सिक्रेट सान्ता कोण असेल बरं ! तर हा ऑफिसमधला आपलयाच कर्मचाऱ्यांपैकी एक असतो.  ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नावाच्या चिठ्या काढल्या जातत आणि प्रत्येकाला एक एक चिठी उचलायला सांगितली जाते.  कोणाचे नाव कोणाल आले आहे  हे फक्त त्या व्यक्ती खेरीज दुसऱ्या कोणालाही ते नाव सांगण्यास मनाई असते. नाताळच्या दिवशी सिक्रेट सान्ताने त्या व्यक्तीसाठी सिक्रेटली गिफ्ट ठेवायचे असते.. खरच कामाच्या रोजच्या रामरगाड्यात अशाप्रकारे सिक्रेट सान्ताकडून मिळालेले गिफ्टची मज्जा काही औरच असते..लहानपणी उशीखाली मोजा ठेऊन झोपायची मज्जा आणि मोठे झाल्यावर ओफिस डेस्कवर सिक्रेट सान्ताकडून मिळालेले गिफ्ट या दोन्ही क्षणांचा आनंद हा अवर्णनीय असतो... कितीही मोठे झालो तरी आपल्या मनात एक लहान मुल असते असा म्हणतात... या अशा क्षणी आपल्यातल्या प्रत्येकाला लहानपण जगल्याचा आनंद पुन्हा मिळतो... आपल्याच ऑफिसमधील आपल्या सहकार्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचे आहे हा अनुभव खूप वेगळा असतो... कारण फक्त कामाच्या निमित्ताने ज्याच्याशी रोज बोलले जाते त्याला कामाच्या चौकटीबाहेर जाऊन काहीतरी द्यायचे आहे हे नकळतच कार्माचार्यामधील ऋणानुबंध अधिक घट्ट करतात. यासाठी काही वेगळे ट्रेनिग प्रोग्राम घ्यावे  लागत नाही...

आयुष्यात पुढे जाताना, यशाची मोठी मोठी शिखर गाठताना आशा प्रकारचे छोटे छोटे पण अविस्मरणीय क्षण खूप मोलाचे ठरतात...रोजच्या रुटीन आयुष्याला नवीन प्रकारची संजीवनी देऊन जातात.. ऑफिसच्या टेबलावर ठेवल्या जानार्या फाईल्स आणि कम्प्युटर समोरच्या जागेवर एक दिवस सिक्रेट सान्ताच्या गीफ्टचा असतो...आणि खरा सांगायचे तर ३६५दिवसांपैकी टेबलवर असणाऱ्या फाईल्स एक दिवस असणारे सिक्रेट सान्ताचे गिफ्ट खूप खूप महत्वाचे असते...

मग आता नाताळ जवळ येतो आहे... आत तुमच्या ही मनात सिक्रेट सान्ताबद्दल ओढ निर्माण झाली असेल.. मी तर खूप एक्सआईटेड आहे सिक्रेट सान्ताकडून गिफ्ट घेण्यासाठी.. आणि तुम्ही पण नक्कीच असाल.. पण गिफ्ट घेण्याच्या नादात तुम्ही स्वतही कोणाचे तरी सिक्रेट सान्ता बनायला विसरू नका... जो आनंद तुम्हाला कोणीतरी देणार आहे... तो आनंद तुम्ही देखील कोणालातरी द्या... 

Saturday, October 8, 2011


अस अचानक काहीतरी घडते आणि आयुष्य एका क्षणात बदलते... आणि गम्मत अशी असते की हा एवढा मोठा बदल घडत असताना हे आपल्यासोबत होणार आहे याची पुसटशी कल्पना देखील आपल्याला नसते... आपण सगळेच अनभिज्ञ असतो या बदलापासून... आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात हे असे घडले असेल किंवा घडणार असेल.... पण या बदलाच्या प्रक्रियेतून प्रत्येकाला जावे लागतेच.... कधी हे बदल चांगले असतात तर कधी वाईट....कधी हसवणारे तर कधी रडवणारे... पण आपल्या मर्जीने किंवा मर्जी विरोधात बदल हे घडत असतात... आणि आपल्या आयुष्याला एक नवा रूप आणि नवा वळण देत असतात.... कधी कधी हा बदल स्वीकारणे सोपे असते तर कधी कठीण... पण जशी जशी वेळ सरत जाते आपणही या बदलना सरसावत जातो... पण एक सांगू हे अशा प्रकारचे बदल घडणे आयुष्याला एक अर्थ देतो... जो खूप गरजेचा असतो....


बऱ्याचदा काही गोष्टी या काही ना काही कारण घेऊन घडत असतात... त्या का घडतात, कशासाठी घडतात त्यामागे काहीच कारण असणे गरजेचे असते असे नाही... कदाचित काहीही करणान नसताना घडण्याची वेळ आलेली असते म्हणून त्या गोष्टी कदाचित घडत असतील... पण आजपर्यंतर ज्या गोष्टी काळाच्या पडद्याआड असतात त्या अचानक ध्यानी मनी नसताना का घडाव्यात.... हे अजूनही एक कोडे आहे.... प्रत्येक गोष्टीला काही तरी कारण असते असे म्हणतात... मग काही गोष्टी अवेळी आणि बिना करणाच्या का घडाव्यात.... काही प्रश्न आयुष्यात अनुत्तरीत राहिलेले बरे असतात.... कारण त्यांची जर उत्तरं मिळाली तर कदाचित जास्त दुरावे निर्माण होण्याची शक्यता असते.... 

Thursday, August 4, 2011

असच काहीतरी..... सहज वाटले म्हणून ....


काहीतरी नवीन घडावे असे रोज वाटत असते... पण नक्की काय घडावे हे माहिती नसते.... काहीतरी बदल हवा असतो.... रोजच्या जगण्यापेक्षा काहीतरी वेगळे हवे असते.. पण काय हे माहिती नाही.... मला  वरचे वर असे वाटते आहे की काहीतरी भन्नाट असा घडावे..... पण काय??? हा विचार आला की मी थांबते..... अशी अवस्था तुमची पण असेल... तेच तेच रुटीन जागून तुम्हालाही कंटाळा आला असेलच.... आपण किती वेडे असतो ना... आपल्याला नेहेमी वाटते की काहीतरी बदल घडावा.... काहीतरी वेगळे व्हावे.... पण नेमकेपणे काय हवे आहे हेच माहिती नसते.... कधी कधी आभाळ भरून आल्यवर वाटते की हा पाऊस फक्त माझ्यासाठी का पडत नाही... उन्हातून चालताना वाटते की थोडीशी सावली फक्त माझ्या डोक्यावर का येत नाही... समुद्र किनारी बसल्यावर वाटते की हा समुद्र माझ्याशी का बोलत नाही... आणि वार्याची झुळूक आली की असे वाटे की मला असा का उडता येत नाही.... असे अनेक वास्तवतेत कधीही न होऊ शकणाऱ्या गोष्टीचा विचार करतो आपण..... मनाला थोडावेळ का होईना थोडासा विरंगुळा देतात म्हणून करतो... की मनाला समाधान मिळावे म्हणून.... हल्ली हे अस नेहेमीचाच झाला आहे... कधी ही काहीही वाटते.. का वाटते ,कशाला वाटते नाही सांगता येत.... पण वाटते.... बसल्या बसल्या एक असाच विचार मनात आला की आपल्याला आयुष्याकडून नक्की काय हवा आहे... चौकटीत आखून दिल्याप्रमाणे आयुष्य नाही जगायचे आहे.. कारण आपण ठरवलेल्या गोष्टी होतीलच असे नाही... आपण निश्चित ठिकाणी पोहोचू असे नाही.... पोहोचलो तरी ठरवलेल्या वेळेत पोहोचू असे नाही... आणि ठरवलेल्या वेळेत पोहोचलो तरी जे हवे आहे ते तेव्हा मिळेलच असेही नाही.... आयुष्य नावाच्या गीफ्टचे  प्लॅनिइंग करता येत नाही ... कारण पुढच्या क्षणाची शाश्वती नसते... येणार क्षण आपल्याला हवाल तसं असेलच याची खात्री नसते.... तरी ही आपण आयुष्यावर प्रेम करतो... खूप जास्त प्रेम करतो....पुढच्या क्षणाची परवा करायची नाही असे ठरवले तरी ही जीवन विमा  पॉलिसी काढतो....  हवा तसं जगायचे ठरवले तरी नोकरीसाठी बांधील राहतो.... आभाळात उडायची स्वप्न बघताना पायात लोखंडी साखळदंड बांधतो.... कितीही स्वतःला स्वतंत्र म्हटले तरीही कुठे ना कुठे जखडून ठेवतो...
कधी कधी असे वाटते की आरशासारखे मन घासून पुसून चकचकीत का करता येत नाही... जे मनात आहे ते समोरच्या माणसाला का सांगता येत नाही... असे वागलो तर नाती जस्त वेळ नाही की टिकून राहणार... लोणच बराच वेळ टिकायला आपण त्यात तेल आणि मिठ घालतो..... मग नाती टिकवायला का कोणी कुठचे उपाय करत नाही....स्वतःचे स्टेटस माणसे जपतात.. अहंकार जपतात.... राग रुसवे जपतात.. पण नाती का जपत नाही..... कोणी वाईट बोलले तर जन्मभर लक्षात ठेवतो.... पण चांगले वागले तर कोणाच्या का लक्षात राहत नाही....  माणूस हा एक विचित्र प्राणी आहे... त्याच्या अशा आणि अपेक्षा कधी संपत नाही.....  बदल हवा असतो पण बदल घडवण्याची मानसिकता नसते... काहीतरी करायचे असते... पण करण्याची हिम्मत नसते..... आणि स्वप्ना बघायची असतात पण टी पेलवण्याची ताकद नसते.... आपण सर्वही असेच आहोत.... असा नही वाट का की थोडासा बदलायला हवे... बदल होण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे...
 माझा प्रवास सुरु झाला आहे... तुमचा काय... निघालात की अजूनही विचारच करता आहात?????.... J

Wednesday, August 3, 2011

आयुष्य हे कढईतले कांदे पोहे ......


पोहे हा खाद्यपदार्थ म्हणून कितीही लोकप्रिय असला तरीही जेव्हा आयुष्याला कांदे पोहे ही उपमा दिली जाते तेव्हा थोडसं वेगळे वाटते. तुमच्याकडे पोह्यात(आयुष्यात) काय चालू आहे असा कोणी प्रश्न विचारला तर????? आणि नेमकी भुकेच्या वेळी तर मग मज्जच मज्जा.... जोक्स अपार्ट.... खरच आपल्यापैकी प्रतेकाचे आयुष्य हे कढईतले कांदे पोहेच आहे....कधी कधी प्रश्न पडतो की ज्याने गाणे  लिहिले त्याने कांदेपोहेच का निवडले...... दुसरा कोणता पदार्थ का निवडला नाही....थोडासा विचार केल्यावर लक्षात आले की पोहे हे सर्वांचेच आवडते आहेत.... पोहे ना आवडणारा एखाद दुसराच.... म्हणूच ज्याने गाणे लिहिले त्याने सर्वांनाच नशिबाच्या कढईतल्या कांदे पोह्यांची उपमा दिली...
कुणाचे खमंग, कुणाचे करपलेले, कुणाचे तेल जास्त असलेले तर कुणाचे कोरडे...... कुणाचे तिखट.... कुणाचे अळणी .... कुणाच्या पोह्यात बटाटे तर कुणाच्या शेंगदाणे....तर काही जणाचे एकदम परफेक्ट.... आपल्या आजुबाजुच्याचे आयुष्य पहिले तर कांदे पोह्याचे कितीतरी प्रकार आपल्याला दिसतील...... खाताना सुद्धा पोह्याच्या जितक्या चवी समजल्या नसतील तितक्या चवी आपल्या आजूबाजूला आढळतात.... पोहे प्रत्येक घरी बनतात पण प्रत्येक घरची चव ही वेगळी असते... तसेच आपल्या आयुष्याचे ही असते.. राहायला एकत्र पण विचारांनी, स्वभावानी प्रत्तेक जण वेगळा .... प्रत्येक जण निराळा.... कुणी तिखट ... तर कुणी आंबट गोड....तर कुणी खरात... जो तो स्वतःला आवडेल तसे आपल्या आयुष्याचे कांदेपोहे बनवत असतो... आणि हवी तशी चव आणत असतो....
प्रत्येक जण एकमेकांच्या बशीतले कांदे पोहे खातात .. त्याला नाव ठेवतात... त्याची स्तुती करतात... कुणी मागून बोलतात तर कुणी तोंडावर पण एक चमचा का होईना ते तुमच्या आयुष्यातले कांदे पोहे खातात.... म्हणजेच कसे का होईना... कुणीही का होईना प्रत्येकाला दुसाऱ्याचे कांदे पोहे खाण्यात इंटरेस्ट हा असतोच असतो... आपण सर्वच जण या नशीब नावाच्या कढईत कांदे पोह्या सारखे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे होत असतो... कधी चटके बसतात... तर कधी मिरचीच्या फोडणीतून ठसका लागतो.... पण कांदा, मिरची, आले, लिंबू, हळद, कडीपत्ता, मीठ आणि थोडीशी साखर या सर्वाच्या एकजीव मिश्रणात जेव्हा पांढरे शुभ्र पोहे उडी मारतात तेव्हा सर्वच जण एकमेकांच्या रंगांत मिसळून जातात. आणि खमंग असे कांदे पोहे तयार होतात.... आपणही असेच आयुष्याच्या कढइत तावून सुलाखून निघत असतो.. आयुष्याचे वेगवेगळे रंग पाहत असतो त्यात मिसळत असतो.... आणि शेवटी प्रत्येकाला आलेल्या अनुभवावरून प्रत्येकाच्या कांदे पोह्याची चव ठरत असते.... माझे कांदे पोहे अजून शिजता आहेत.... तुमच्या कांदे पोह्याची चव कशी आहे...... ???????????????? J

Thursday, June 16, 2011

Every relation is concept.... Every individual is reality....


Every relation is concept.... Every individual is reality....


वर वर पाहता एक छोटस वाक्य पण अख्या आयुष्याचा अर्थ यात लपलेला आहे. खरच एखाद्या नात्यामध्ये जेव्हा आपण गुंततो तेव्हा बऱ्याचदा आपण एक चूक करतो.. माहिती आहे कोणती.. जरा विचार करा.. समजली... ठीक आहे..सांगते ...आपण समोरच्याला गृहीत धरण्याची चूक करतो.... हो.. बऱ्याच गोष्टींसाठी आपण आपल्याच माणसाना गृहीत धरतो... आपण मुद्दामून काही करत नाही.. हे ओघात होऊन जातो.. नेहेमी आपणच करतो असा नाही.. आपल्यासोबतही असे होते.. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला असे नात्याच्या तराजुत आपण सगळेच जण तळ्यात मळ्यात खेळत असतो...

ह्म्म्म ...आयुष्याची एक खरी बाजू अशी समोर आल्यावर कुणीतरी जागा केल्यासारखा वाटले का..? पण हे वास्तव आहे.. आपण 
कळत नकळत या गोष्टी कधी करतो तर कधी या गोष्टीना सामोरे जातो... माहिती आहे का कारण आपण नात्याला महत्त्व देतो... नात्यामध्ये असणाऱ्या त्या व्यक्तीला नाही... त्या व्यक्तीच्या भावनांना नाही... कोणतेही नाते तेव्हाच यशस्वी होते जेव्हा त्या नात्यामधले दोघही एकमेकांना समजतात म्हणजे काय करतात तर ते दोघेही नात्यापेक्षा एकमेकांच्या भावनांना महत्व देतात... खरा सांगू तर शब्द मांडता येत नाहीये... कुठेतरी काहीतर निसटून जाते आहे असे वाटते ..पण एक गोष्ट मात्र नक्की की कोणतेही नाते निभावताना त्यातल्या समोरच्या माणसाच्या भावना समजून घ्या ... त्यानाही महत्त्व द्या.. मग ते नाते कोणतेही असो... आई मुलाचे , नवरा बायकोचे, भाऊ बहिणीचे किवा मित्रांचे... शेवटी.. आपल्यालाही कुणीतरी खऱ्या अर्थाने समजून घ्यावे असे वाटते ना.... Every relation is concept.... Every individual is reality.... so respect each other's individuality in relationship

Saturday, May 7, 2011

आई ....


सांगता  येणार नाही आई मला , रोज तुझी किती आठवण येते..
रोज रात्री थकून घरी आल्यावर... तुझी कुशी आजही आठवते..
जेव्हा वाटते शांत झोप हवी आहे.. तेव्हा तुझी मांडी आठवते...
दिवस वाईट गेला कि तुझी हळवी मिठी आठवते...
आणि आनंदाच्या क्षणी  तुझ्या डोळ्यात येणारे पाणी आठवते...
कसा सांगू तुला आई, रोज तुझी किती आठवण येते...

मी फोने केला नाही कि तू कासावीस होतेस...
आणि फोन केल्यावर काळजीपोटी तू मला ओरडतेस..
तुझ्या ओरडण्यामागाचे  प्रेम मला जास्त आवडते...
कसा सांगू तुला आई, रोज तुझी किती आठवण येते...

जेव्हाही वाटते  कि हे अशक्य आहे..
तेव्हा फक्त तूच धीर देताना आठवतेस...
माझ्या प्रत्येक संकटात देवापुढे  तू प्रार्थना करते...
तुझे आशीर्वादाच मला लढायची ताकद देतात..
रोज रात्री तुझ्या प्रार्थना माझ्यापर्यंतर  पोहोचवतात...

खरा सांगते आई ... पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे...
सगळी दु:ख विसरून तुझ्या कुशीत निवांत झोपायचे आहे...
पुन्हा एकदा तुझ्या कडेवर बसून..हे जग पहायचे आहे..
आई मला पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे... 
तुझ्या गळ्यात पडून पुन्हा... तुझी किती आठवण येते ते सांगायचे आहे...

Wednesday, May 4, 2011

लग्न म्हणजे व्यवस्था आहे का?


"ठाकून ठोकून  आकार देता येईल ,आपल्या सोयीनुसार, स्वभावानुसार वाकवून, बदलून घेता येईल अशी एक व्यवस्था म्हणजे लग्न..." हे वाक्य आहे  शोभा डे  यांच्या स्पाऊस - संसार सुखाचे रहस्य या पुस्तकातले..... हे वाक्य नजरेस पडताक्षणी मनाला  खटकले... लग्न म्हणे काही व्यवस्था नाही.... लग्नाला व्यवस्था असे म्हणणे मला आवडले नाही... लग्न हि संस्था आहे.. तिला आकार देता येत नाही... झाडाला बिलगून वाढणाऱ्या वेलीसारखी ती वाढत जाते... आणि आयुष्याला एक अर्थ प्राप्त होतो.. ही वेल फुलते, फुलवते आणि समोरच्या  माणसाला भरभरून आनंद देते...हे सर्व असताना लग्न ही व्यवस्था कशी होऊ शकते? दोन माणसांच्या मर्जीने निर्माण  झालेले नाते ही व्यवस्था कशी असू शकते ????

लग्न ही व्यवस्था म्हणून समजणारे आणि त्याचप्रमाणे जगणाऱ्या जोडप्यांना पाहून मला आश्चर्य वाटते.  किती तांत्रिकपणे वावरत असतील ही माणसे... स्वतःला त्रास करत ,दुसऱ्याची मर्जी सांभाळत... स्वतःच्या मनाचे विदीर्ण तुकडे करत आपले आयुष जगताना यांच्या मनात काहीच येत नसेल का? म्हणूनच लग्न ही व्यवस्था आहे असे म्हणायचे का? जर असे असेल तर 'लग्न' या व्यवस्थेत नक्की कीव करावी तरी कुणाची? त्यात अडकलेल्या माणसांची, समाजाची, लग्नाची कि स्वतःच्या सोयीनुसार बदलणाऱ्या या व्यवस्थेची....

लग्न ही व्यवस्था म्हणता म्हणता अशा अवस्थेला पोहोचली आहे की नेमक्या कोणत्या शब्दात तिचे वर्णन करावे हेच समजत नाही... बदलत्या दुनियेच्या नजरेतून पाहताना असे जाणवते की प्रत्येकजण स्वतःच्या सोयीनुसार नात्यांची गुंफण करतो आहे.. जिथे समर्पण आहे अशी नाती ओझी वाटतात आणि ज्या नात्यांमध्ये एकमेकांशी काहीही देणे घेणे नाही अशी नाती संस्कृती म्हणून समाजात आपले बस्थान बसवता आहेत..  नेमकेपणे सांगता येत नाही पण लग्नाचा प्रवास हा नेमका कुठल्या दिशेला होतो आहे याचा पत्ता लागत नाही.. आणि शोध घ्यायचा म्हटले तर कुठून घ्यावा हेच काळात नाही.......

आपल्या आजू बाजूला नजर फिरवल्यावर देखील अशी विखुरलेली नाती दिसतील.... वरून सर्व काही व्यवस्थित असणारी नाती आतून किती कमजोर आणि जीर्ण झालेली आहेत याचा आपल्याला पत्ता लागणे देखील कठीण आहे.... अशी ही समाजातली सगळ्यात महत्वाची लग्न संस्था आज कुठे चाली आहे.. हे कुणालाच माहिती नाही.... जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की सांगा.... हा शोध घ्यायला  मलाही आवडेल.....

Monday, May 2, 2011

हे असेही होते ना...

गाठी सोडवण्याच्या नादात कधी कधी आपण गुंता वाढून बसतो आणि तो नुस्तान गुंता नसून न सुटणार गुंता आहे ,हे आपल्या फार उशिरा लक्षात येते...  Sometimes we really bound ourself with so much of responsibility which is actually not at all required..... पण विचारांच्या नादात हा विचार आपल्या मनात येताच नाही...

या विचाराशी मी पूर्णतः: सहमत आहे. खरा पाहता आपण स्व:तवर इतक्या जबादर्य लादून घेतो आणि स्व:ताच्या मनाला सांगतो कि आपण सोडले तर दुसरा तिसर्या माणसाला या गोष्टींशी काहीही देणा घेणा देखील नसते... Love + Sex + Commitment  यात्रीकुतात अडकलेली आजच्या पिढीची अनेक तरुण नाती एकमेकांशी पकडापकडीचा खेळ खेळताना दिसतात. मागच्या पिढीचे असणार नाते त्यांना बोरिंग आणि शिळे वाटते... त्यात नवीन काहीही नाही अशी आजच्या या तरुण पिढीची समजूत आहे... पण वाईट या गोष्टीचे वाटते कि Love आणि  Sex  या दोन आधारांवर येऊन हि नाती बिथरतात... Commitment  पर्यानातर त्यांचा प्रवास होताच नाही..... त्रिकुट म्हणता म्हणत फक्त आपल्या सोयीचे दोन पर्याय निवडून हे मंडळी आजची नाती जोडतात आणि तोडतातही...  सुदैवाने काही १ -२ % नाती या Commitment  पर्यंतर प्रवास करतात ती नाती काही वर्षातच एकमेकांवरच्या विश्वासाच्या अभावामुळे दुरावलेली दिसतात... नेमकेपणाने सांगता येणार नाही पण नात्यांची हि सध्याची अवस्था पाहता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ही नाती कोणत्या स्वरुपात आढळतील याचे भाकीत करणे अवघड आहे..

झपाट्याने काळ बदलतो आहे... नवीन नवीन गोष्टींचा  स्वीकार करत आपण काळाबरोबर बदलतो आहे... बदलत्या काळाच्या वेगाचा कायदा आपण पाळतो आहे... कधी पडतो आहे... कधी धडपडतो आहे...कधी वात चुकतो आहे.. तर कधी ठेचालतो आही... पण कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही अवस्थेत काळाबरोबर धावण्याचा अट्टाहास आपण सोबत घेऊन चाललो आहे... या धावण्याच्या नादात बर्याच गोष्टी मागे सुटता आहेत..कुठेतरी पडता आहेत... पुढच्या वाल्नवत त्या भेटीलच असे गृहीत धरून आपण पळतो आहे... 

जीवनाच्या गाडीपेक्षा platform वरची रेल्वे जास्त महत्वाची आहे... आपल्या प्रिया व्यक्तीला केलेय promis पेक्षा बोस ने दिलेले मनात नसले तरी महत्वाचे आहे...
संद्याकाळी क्रिकेट मतच पेक्षा अलिएइ मीटिंग महत्वाची आहे... सकाळी बायको सोबत बसून एक घोट चहा आणि दोन प्रेमाचे शब्द या पेक्षा ट्रेनची वेळ आणि taffic  ची भीत जास्त आही..... आई शी बोलताना आलेला ग्राहकाचा काल महत्वाचा आहे... अशा असंख्य गोष्टी आहेत.... ज्या तुमच्या माझ्यासोबत घडतात.... या सर्व गोष्टी करताना आपल्या प्रिया व्यक्तींच्या आनंदाचा बळी आपल्याला द्यावा लागतो..... किती विचित्र आहे न हे सर्व....... ज्यांच्या साठी या सर्व गोष्टी करतो त्यांचा द्यायला आपल्याकडे वेळ नाही..... विचार करा... 

Saturday, April 30, 2011

तुमच्या सोबतही असा होते का?

नकळत अचानक काही गोष्टी आठवतं आणि मनाला नकळतच एक काम लाऊन जातात. समजत नाही असा का होते , पण हे जसा माझ्याबरोबर होते तसा तुम्च्याबारोबारही होत असेल असा मी समजते. काही कारण नसताना असंख्य प्रश्न मनात येतात आणि त्यांची उत्तर जवळ नसतान डोकं भंडावून सोडतात... का, कशाला,कशासाठी... माहिती नाही... पण हे असा होते.. आणि आपण यावर विचार करतो हे नक्कीच.. असा म्हणतात हर क्यून का जवाब नाही होता... पण बर्याचदा मन हो अशाच जवाब नसलेल्या प्रश्नाभोवती फेर धरून पिंगा घालत बसते... आणि या वादळातून आपली सुटका होणे कठीण होऊन बसते....

अशाच काहीशा अवघड मनस्थितीमध्ये आज सापडले आहे.. एखादी गोष्ट हरवली तर ती सापडेपर्यंत त्याचा शोध घेता येतो... पण नेमका काय हरवले आहे ह्याच्या पत्ता नसतान जर शोध घेत राहिलो तर.... उफ्फ्फ्फ  असा का होते........ खरच काही प्रश्नाची उत्तर हि कधीच मिळत नाही... आणि मन पण इतके वेडे असते कि त्याला अशाच प्रश्नाची उत्तर हवी असतात..... तुमच्यासोबत हि असा होते का?

Thursday, April 28, 2011

लग्न झाल्यावर सर्वात जास्त tension असते ते दोन मुख्य व्यक्तींना. एक म्हणजे सासूबाई आणि दुसरी म्हणजे सुनबाई. आजकाल टीवीच्या वाढत्या प्रभावामुळे दोघी आधीपासूनच आपापली आयुध सज्ज करून मैदानात उतरतात. गमंत अशी असते कि दोघींना ही एकमेकींशी स्पर्धा करायची असते, ज्याला वास्तविक काही अर्थच नसतो पण तरी सुद्धा झुकत माप घेण्यासाठी कोणीही तयार नसते... का? हा प्रश्न मला हल्ली जास्त सतवायला लागला आहे. 
बऱ्याचा सासूबाई अशी मानसिकता असते की जे माझ्या सासूबाईनी   माझ्याकडून करून घेतले आहे ते मी सुद्धा माझ्या सुनेकडून करून घेणार... हा असा विचार करण्यात काही गैर नाही .. हा मनुष्याचा स्वभावाच आहे... जे आपण केले ते समोरच्या माणसाकडून आपण करून घ्यायचे.. ही मानसिकता  तुमची आणि माझी सुद्धा आहे.. मनुष्यप्राणी म्हटल्यावर या आशा आणि अपेक्ष्यांचे  ओझे आपण समोरच्या माणसावर लादणारच ... का तर आपल्यावर हे ओझ कुणीतरी लादेले होते म्हणून...

किती वेडे  असतो ना आपण... जी गोष्ट आपल्यावर लादलेली  आपल्याला आवडत नाही तीच गोष्ट आपण समोरच्या माणसावर लादण्याचा प्रयत्न करतो... 

सासू सुनेचे नाते हे येथे एक उदाहरण म्हणून दिले  आहे.. कारण सर्वात जास्त आशा आणि अपेक्षा या नात्यातच असतात. सासूबाई या परंपरेने चालवत आलेल्या रूढी सांभाळत असतात आणि सुनबाई या globalization च्या नव्या प्रवाहातल्या असल्यामुळे या सर्व गोष्टी त्यांना बंधनकारक वाटतात... त्यांना स्वतःचे स्वतंत्र हिरावून घेतल्यासारखे वाटते... आणि आपल्यावर खूप जास्त अन्याय होतो आहे असे त्यांना वाटते .... आणि  सासूबाईना  या नव्या अवतारातील सुनेचे बंड पचून घ्यायला  जमत नाही... कारण दोघीनाही स्वतःही अशी ठाम मत असतात आणि एकीलाही आपली मत सोडायची नसते....

पण मला असो वाटते की ५० ते ६० वर्ष्यांच्या  सासूबाई  मतपरिवर्तन करण्यापेक्ष्य सुनेने स्वतः थोडेसे झुखावे... याचा अर्थ असा होत नाही की तिने संपूर्णपणे वाकावे... पण शक्य असेल तिथे जरूर.. शेवटी हा प्रत्येकाचा सर्वस्वी प्रश्न आहे... प्रत्येकाची मत ही माझ्य्याशी सहमत असतीलच असं नाही पण यावर तुम्ही सर्वांनी विचार करावा अशी माझी इच्छा आहे.

सासू कितीही चांगली असली तरी तिला आई बनता येते असे नाही त्याचप्रमाणे सून किती ही चांगली असली तरी तिलासुद्धा मुलगी बनता येतेच असे नाही.. पण तरीसुद्धा दोघीजणी हा प्रयत्न नक्कीच करत असतात ... आपल्यापैकी काही जण पुढे जाऊन या आई मुलीच्या नात्यापार्यंतर पोहोचले असतील... अशा सर्वांचे मनापासून अभिनंद...

आणि बाकी सर्वाना ALL THE  BEST  :)

Wednesday, April 27, 2011

आयुष्य कधीतरी इंद्रधानुश्यासारखे भासते. इतके वळण घेत आयुष्य जात असते. हे एका ठराविक उंचीवर पोहोचल्यावर दिसते. आज मलाही या वळणाचा नव्याने परिचय झाला. काही लोक फक्त काही क्षणांसाठी आपल्या आयुष्यात येतात , पण त्यामुळे आपले संपूर्ण आयुष्याच ढवळून निघते . त्यांची ये जा आयुष्यात चालूच असते. एक मित्र म्हणून आपण त्यांच्याशी बोलतो, नव्याने पुन्हा नात्याला सुरुवात करतो, पण गंमत अशी असते कि ते नाते नव्याने फक्त आपल्यापुरतेच चालू झालेले असते. समोरची व्यक्ती मात्र जुन्या नात्याचेच धागे पकडून बसलेली असते. अशावेळी आपल्याल्या अशा नात्यांना न्याय देणे कठीण होऊन बसते. प्रतेय्क माणूस हा नेहेमी मनामध्ये दोन कप्पे करून चालत असतो. एक कप्पा वर्तमान काळासाठी आणि दुसरा भूतकाळसाठी.बऱ्याचद भूतकाळ हा रम्य आठवणी देणारा असतो, पण काही माणसांची आठवण काढली तर फक्त आणि फक्त मनाला टोचणार्या वेदनाच होतात.